मी का लिहिते ? 🖋🖊
माझे लेखन - माझी ऊर्जा
स्वतःला अभिव्यत करण्याचा,स्वतःलाच गवसून पुढे मार्गस्थ होण्याचा यशस्वी मार्ग ! स्वतःच्या जगण्याला,अस्तित्वाताला अर्थपूुर्णता
येते आणि त्याचा मला स्वतःला अनुभवही येत आहे.
विद्यार्थीदशेत असताना कविता,लेख लिहीत होते.पण ते मर्यादित स्वरूपातच राहिले.ही कुपी मनाच्या एका कोपऱ्यात लपून राहिली.पण अनेक वर्षांनी ही कुपी उघडली आणि सुंगंधित झाले.मनाची दारे उघडली.कविता,लेख लिहिण्यास नकळतपणे पुन्हा सुरवात केली आणि माझ्या ह्या लेखनामुळे मला ऊर्जा मिळाली. सर्व नकारात्मक विचार बाजूला गेले आणि पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली.कविता,निंबध, लेख ह्यातून अभिव्यक्त होऊ लागली.
कविता ही उत्स्फूर्त असते.ती सहजपणे मनात स्फुरते अन लेखणीतून उतरते.आता मला अमुक विषयावर कविता करायची आहे अन कविता लगेच लिहिली असे होत नाही.सहज हळूवारपणे उलगडणारी रेशीम गाठ असते.वेळ कधीच नसतो पण असेल आवड तर मिळेल सवड !आपल्या आवडीसाठी छंदासाठी वेळ काढावाच लागतो अन तो आपोआप आवडीतून मिळतो.अनेक साहित्यिक ह्यांचे साहित्य वाचन करू लागले.आणि मग वाचन,लेखनअभिव्यक्ती ह्या साखळीचा मला छंदच लागला.एवढेच काय रोजची दैनंदिनी लिहिण्याची सवय होती.फक्त लिहून ठेवायची आणि मन हलकं करत असे.आता त्याला योग्य दिशा मिळाली.
मी स्वतः नोकरी करते. शिक्षिका आहे .संसार ..नोकरी ही वाटचाल माझ्या आवडी ,छंद जोपासत करत आहे.स्वानुभव,निरीक्षण,कल्प्नाप्रवास,माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यसोबतच्या गमतीजमती,अनुभव,वाचन,समाजात घडणाऱ्या घडामोडी,गोष्टी अशा विविध विषयावर कविता,लेख,निबंध,पथनाट्य,गोष्टी स्वअभिव्य्क्तीतून लेखणीतून उतरवण्याचा प्रयत्न करते.स्वतःला आनंद देण्यासाठी,व्यक्त होण्यसाठी,विकसित करण्यासाठी माझी साहित्यससुमनांजली उपयोगी पडते.माझ्या शिक्षकी पेशामुळे निरागस मुले त्याचसोबतचे अनुभव लिखाणास प्रेरणा देतात.वर्तनमानपत्र, मासिक ह्यातून कविता,लेख प्रकाशित होतात. स्वतःची शाळा, संस्था ह्यांचे वृत्त लेखन करते.विद्यार्थ्यांनाही चला वाचूया, लिहुया सदराखाली वाचन,लेखनास प्रवृत्त करते.शाळेत ,घरी वाचनकोपरा, वाचनकट्टा राबविते.सोशल मीडियावरही माझे लेखन चालू असते. मी जास्त रमते ती कवितेत.कवितेच्या भावविश्वात मी हरवून जाते.
कविता जेंव्हा स्फुरेल तेंव्हा लगेच लेखणीतून कागदावर उतरवते.लेख रात्री घरातील कामे आटोपल्यावर लिहिते..जीवनात सुखदुखाचे अनेकप्रसंग येतात.त्यांना मी लेखणीतून अभिव्यक्त करते.अन मी रीलेक्स होते.माझा छंद.आवड मला अपडेट ठेवते.मन प्रसन्न राहते.वाचन,.श्रवण जुनी गाणी ऐकल्यामुळे कान व मन सुमधुर करतात.वाचनाशिवाय पर्याय नाही.
माझे लेखन माझी ऊर्जा आहे.मी लहान मुलांना शिकविते(प्राथमिक शिक्षिका) लहान मुलांमध्ये तर भरपूर ऊर्जा असते.ही मुले कधीच थकत नाही.त्यामुळे मी पण मनाने चिरतारण्याचा अनुभव घेते.आणि ह्या चिरतारुण्याला साथ माझ्या छंदाची! मुलांसाठी अनेक उत्स्फूर्तपणे कविता,गाणी ,गोष्टी त्यांच्यासमोर सादर करते आणि त्यांच्याकडूनही करून घेते.त्यांच्याबरोबर रमतात सर्व विसरून वेगळाच उच्चकोटींचा आनंद मिळतो.त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.मन कधीच थकत नाही.मग माझे विद्यार्थी पण प्रोत्साहन मिळताच त्यांच्या भाषेत लेखन करतात.माझी विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी घरी येतात.त्यांना मार्गदर्शन करताना स्वतःलाही शिकायला मिळते ,नवीन अनुभव मिळतो .शाळेत कार्यक्रमाचे निवेदन करताना माझा छंद मला उपयोगी पडतो.चारोळी,कविता ह्या स्वरचित निवेदनात उवयोगी पडतात.खरं तर लेखणी हे माझे शिक्षक म्हणून महत्वाचे साहित्य शस्त्र आहे.त्याचा योग्य उपयोग करून साहित्यनिर्मितीचा आनंद मी घेत आहे.
माझ्या घरी हॉलमध्ये दोन्ही बाजूला नारळाची झाडे आहेत.मी हॉलमध्ये बसून लेखन,वाचन करते.झाडावरील पक्षी त्यांचा किलबिलाट ,झावळीतून डोकावणारा चंद्र मन प्रसन्न करते आणि लेखणीतून नकळतपणे काव्य स्फुरते.
घरातील कामे करतानाही काहीतरी सुचते ,आठवते आणि मनाच्या कॅनव्हासवर ते उमटते कायम स्वरूपात! आणि मग लेखणीतून कागदावर!
कविता ,लेख ,वाचन साहित्यसुमनाजलीमुळे. मी आनंदी होते व हा आनंद स्वअभिव्यक्तीतून उतरवण्याचा प्रत्यन करते .कविता,निंबध लेखनासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले आहे.जसे माझ्या लहान मुलांना छान ,शाब्बास कौतुकाची थाप मिळाली की आनंद होतो तसेच अशा बक्षिसामुळे पुढे वाटचाल करण्यास प्रेरणा मिळते. ह्यात माझ्या कुंटूबाची मला साथ आहे अन माझ्यातला शिक्षक माझ्या सोबतीला आहे.,ह्याचा अभिमान आहे.आपण खूप थकलो की लिंबूसरबत पितो.मग थोडी तरतरी येते.पण माझा छंदच माझी ऊर्जा आहे.घरात,शाळेत,प्रवासात कुठंही असू द्या माझ्याबरोबर -माझ्या मनात माझा छंद असतोच ! कधीही साथ सोडत नाही आणि सुटणारही नाही.हिरकणीचे वात्सल्य, झाशीच्या राणीची धडाडी,सावित्रीबाई फुलेंचा शिक्षणवसा, गरुडभरारीची झेप मला माझा छंद देतो. चुलमूल ह्यातून बाहेर पडून भरारी घेण्याचे बळ माझे लेखन देते्.लेखणीची मी आभारी🙏🏻
गवसला स्वतः ती गवसली तिच्या लेखनातून!🖋